CM Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

दौरा अर्धवट सोडून CM शिंदे दिल्लीला रवाना

मंत्रिमंडळ विस्तार आणि एक ऑगस्टला होणाऱ्या सुनावणी संदर्भात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by : Team Lokshahi

औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि एक ऑगस्टला होणाऱ्या सुनावणी संदर्भात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलच्या फॉर्मुल्यावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं, मात्र सध्या या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोनच पदं असल्यानं विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतेय.

सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?