सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
या आठवड्यात सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्यात आली असून मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो 77 रुपयांवरून 78रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.