CNG Gas  CNG Gas
ताज्या बातम्या

CNG Gas : मुंबईत सीएनजी पुरवठा ठप्प; वाहतुकीवर गंभीर परिणाम

गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला नुकसान झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी वितरण अचानक विस्कळीत झालं.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला नुकसान झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी वितरण अचानक विस्कळीत झालं. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दिलेल्या माहितीनुसार वडाळा येथील सिटी गेट स्टेशनचा पुरवठा थांबल्याने अनेक सीएनजी पंप बंद पडले.

सीएनजीवर अवलंबून असलेल्या बस, ऑटो आणि टॅक्सी या वाहनांच्या सेवांवर याचा मोठा परिणाम झाला. अनेक पंप बंद असल्याने चालकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागलं. काही ठिकाणी पंप पूर्णपणे बंद दिसले.

दरम्यान, घरगुती पीएनजीचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं एमजीएलने स्पष्ट केलं. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून निवासी भागाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

खराब झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी गेल आणि एमजीएलच्या पथकांनी काम सुरू केलं आहे. पूर्ण क्षमतेनं गॅस प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर सीएनजी पंपांवरील पुरवठा सामान्य होईल, असं एमजीएलने सांगितलं असून नागरिकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात

  • सीएनजी गॅस बंद असल्याने त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला

  • 24 तास उलटून गेले मात्र सीएनजी पंपावर सीएनजी गॅस नाही

  • ठाणे स्थानक परिसरात रिक्षा प्रवाशांची मोठी रांग बघायला मिळते

  • पाच लेयर असलेल्या रिक्षा स्थानक परिसरात तीन लेयर सीएनजी गॅस नसल्यामुळे रिक्षा उभ्याच..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा