ताज्या बातम्या

Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड आजपासून नागरिकांसाठी खुला; ‘या’ वेळेत करता येणार प्रवास

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.

या मार्गिकेवरील वाहतूक शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू असणार आहे.

2.7 किमीच्या बोगदा असलेल्या ठिकाणी ताशी 60 किमी वेगमर्यादा असणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...