मुंबईमधील बहुप्रतिक्षित प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प कधी सुरु होणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या नवीन वर्षामध्ये हे काम पूर्ण होऊन वांद्रे-वरळी-मरीन ड्राईव्ह असा दोन्ही बाजूचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. याआधी एका बाजूचा प्रवास सुरू करण्यात आला आहे. सध्या वरळीतील सी लिंक परिसरात वांद्रे ते वरळी आणि वरळी ते मरीन ड्राईव्ह जोडण्यासाठी सी लिंक परिसरात दुसऱ्या गर्डरच काम देखील पूर्ण झालं आहे. मात्र, या संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चासाठी आता १३०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
थोडक्यात
मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात
कोस्टल रोडच्या कामाच्या खर्चात 1300 कोटींची वाढ
कोस्टल रोडचा एकूण खर्च 14 हजार कोटींवर
वांद्रे-वरळी-मरीन ड्राईव्ह दोन्ही बाजूचा प्रवास लवकरच सुरू होणार
कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी १३०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता हा खर्च १४ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या भाग-१ च्या कामासाठी ५२९० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंकचे दक्षिणेकडील टोक या भाग-२साठी ३२११ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. पुढल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या कामासाठी ४२२० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. अशा प्रकारे सर्व टप्प्यांतील खर्चात ३३९ कोटींची वाढ झाली. त्यानंतर एकूण सुधारित खर्च १३०६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
नेमका हा खर्च कोणकोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला?
या प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या भाग-१ च्या कामासाठी ५२९० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.
बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंकचे दक्षिणेकडील टोक या भाग-२साठी ३२११ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती.
पुढल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या कामासाठी ४२२० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. अशा प्रकारे सर्व टप्प्यांतील खर्चात ३३९ कोटींची वाढ झाली.
त्यानंतर एकूण सुधारित खर्च १३०६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
मच्छीमारांच्या बोटीच्या जाण्या-येण्यासाठी दोन खांबामधील अंतर वाढवून एकल खांबी बांधकामाचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रकल्प खर्चात ९२२ कोटी रुपयांची वाढ झाली.
आता नवीन टेट्रापॅड बसवण्यात आले. त्यासाठी ४७. २७ कोटी रुपये खर्च झाले.