Maharashtra Cold Wave  
ताज्या बातम्या

Cold Wave : महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कहर! मुंबईत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आता येणारा आठवडा राज्यभर कडाक्याच्या थंडीचा असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पार्‍यात मोठी घसरण होऊ शकते. तापमान १३ अंश सेल्सिअस ते थेट ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असून, सकाळ-संध्याकाळ कडाक्याची थंडी जाणवणार आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतल लहरींमुळे महाराष्ट्रावर थंडीचे सावट अधिक दाटून येणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्या सोमवारी राज्यातील काही भागांमध्ये या लहरींचा तीव्र प्रभाव जाणवण्याची चिन्हे आहेत.

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतल लहरींमुळे तापमान झपाट्याने घटण्याचे संकेत मिळत आहेत. आज आणि उद्या (सोमवार) राज्यातील काही भागात शीतल लहरींचा प्रभाव अधिक प्रकर्षाने जाणवू शकतो. मुंबईत सकाळ-संध्याकाळ थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवेतील गारठा अधिक तीव्र होणार आहे. पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही पार्‍यात विक्रमी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हवामानातील या मोठ्या बदलामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व विभागांना थंडीच्या या नव्या लाटेने गारठवण्याची शक्यता असल्याने प्रशासनही खबरदारीच्या मोडवर!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा