Pune Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिवम शेट्टी व पुनीत बालन ग्रुप यांच्यात सहकार्य करार

'तायक्वांदो'तील इंडिया रँक-१ चा खेळाडू

Published by : Sagar Pradhan

चंद्रशेखर भांगे।पुणे: माउंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तरुण खेळाडू शिवम शेट्टी याच्या समवेत 'पुनीत बालन ग्रुप'च्यावतीने सहकार्य करार करण्यात आला आहे. ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

शिवम शेट्टी हा इंडिया रँक-१ चा तायक्वांदो खेळाडू आहे. त्याने नुकतेच माऊंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. शेट्टी यांनी आत्तापर्यंत एकूण 13 राष्ट्रीय पदके आणि तीन आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. या तरुण खेळाडूचे आगामी काळात तायक्वांदो जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याचे आणि आशियाई खेळांमध्ये भाग घेऊन जागतिक क्रमवारीत स्थान मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

आता पुनीत बालन ग्रुपच्याबरोबर सहकार्य करार झाल्याने शिवमला भविष्यातील उद्दिष्टे गाठण्यासाठी खेळाचे साहित्य, प्रशिक्षक, आहार आदी मदत आणि सहकार्य मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा