बॉलिवूडचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा बहुचर्चित शो 11 ऑगस्टपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर प्रसारित झाला आहे. या शोची उत्कंठा चाहत्यांना सुरुवातीपासूनच लागलेली पाहायला मिळाली आहे. दरम्यान कौन बनेगा करोडपतीला 25 वर्षे पुर्ण झाली असून पुन्हा एकदा 17 व्या सीझनसह अमिताभ बच्चन प्रेक्षकांसाठी ज्ञानाचा खेळ खेळण्यास सज्ज झाले आहेत.
केबीसीच्या स्टेजवर अनेक मोठे मोठे चेहरे आलेले पाहायला मिळाले आहे. दरम्यान यावर्षी देशाचा 79वा स्वातंत्र्यदिन आहे, याचपार्श्वभूमिवर 15 ऑगस्टच्या निमित्ताने केबीसीच्या स्टेजवर असे चेहरे आलेले पाहायला मिळणार आहेत. ज्यांनी नुकताच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली वीरता दर्शवली.
स्वातंत्र्यदिनी भारतीय सैन्यातील तीन शूर महिला अधिकारी म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कमांडर प्रेरणा देवस्थली या तिघी 'कौन बनेगा करोडपती'च्या सिंह हॉट सीटवर पाहायला मिळणार आहेत. स्वातंत्र्यदिनाचा स्पेशल एपिसोड केबीसीच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये तिन्ही ऑफिसर्स 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देणार आहेत. तसेच, तिघी बिग बींना 'ऑपरेशन सिंदूर'बाबत अनेक गोष्टी सांगतील.
शोच्या भव्य प्रीमियरनं त्याची गौरवशाली 25 वर्षे साजरी केली. आता स्वातंत्र्यदिनाच्या खास प्रसंगी, निर्मांत्यांनी एका खास पाहुण्यांना आमंत्रण धाडलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टचा एपिसोड अत्यंत रोमांचक आणि आश्चर्यकारक असणार आहे. स्वातंत्र्यदिनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये भारतीय सैन्यातील तीन शूर महिला अधिकारी सहभागी होणार आहेत. देशाची मान अभिमानानं उंचावणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी झालेल्या भारतीय सेना, वायुसेना आणि नौदलाच्या महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
केबीसीच्या नव्या सीझनमध्ये, 15 ऑगस्टच्या विशेष एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सोनी लिव्हने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या आहेत की," पाकिस्तान हेच करत आलय, मग त्यांना उत्तर देण तर गरजेचं होत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरला प्लॅन केलं गेल. यामध्ये कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नुकसान पोहोचलं नाही पाहिजे... हा एक नवा भारत, नव्या विचारांसह आहे". विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितलं की, "पहाटे 1.5 ते 1.30 पर्यंत अवघ्या 25 मिनिटांत त्यांचा खेळ संपवला.