गुगल Google या कंपनीने आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम Work From Home अर्थात घरात बसून काम करण्याच्या मुभेवर बंदी घातली आहे. आता गुगलच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम Work From Home ही सुविधा मिळणार नाही. कर्मचारी आता सध्या वर्क फ्रॉम होम Work From Home करत आहेत. त्यांना आता ऑफिसला येऊन काम करावे लागणार आहे. जे कर्मचारी ऑफिसला येऊन काम करणार नाहीत. त्यांना ही कंपनी सोडवी लागणार आहे. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे गुगल कंपनीच्या Google Company अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गुगल कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गुगल कंपनीच्या 50 किमीच्या आवारात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायब्रीड वर्क करण्यासाठी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हा बदल गुगल कंपनीच्या कोअर core , मार्केटिंग Marketing, रिसर्च, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन्स Search, Knowledge and Information and Communications या विभागात करण्यात आला आहे. त्यामुळे जाहिरातींसाठी जी टीम काम करते. त्या डिपार्टमेंट Departmentला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. गुगल कंपनी Google Company च्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान ३ दिवस ऑफिसमध्ये येणे बंधनकारक राहणार आहे. तसेच जे कर्मचारी नोकरी सोडणार आहेत.
त्यांच्यासाठी स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम (वॉलंटरी एग्जिट प्रोग्राम) Voluntary Exit Program अंतर्गत वेगळे पॅकेज मिळणार असल्याचे गुगल कंपनी Google Companyने स्पष्ट केले आहे. आपल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण व्हावी, तसेच कंपनीच्या विविध विभागांमध्ये कनेक्टिविटी connectivity व्हावी. त्याद्वारे आपल्या कामकाजामध्ये सकारात्मक बदल व्हावा आणि आपले उत्पन्न वाढावे. यादृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच धर्तीवर अमेझॉन Amazonया कंपनीने ही असाच निर्णय घेत कंपनीतील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. अॅमेझॉन Amazonचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी Andy Jesse यांनी यासंदर्भात एक मेमो जाहीर करून ही घोषणा केली आहे.