ताज्या बातम्या

Guardian Minister | पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीमध्येही धुसफूस | NCP | Lokshahi Marathi

पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी, अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर आरोप. मंत्र्यांना स्वतःचे जिल्हे मिळवण्यासाठी संघर्ष.

Published by : shweta walge

शिवसेनंनेनंतर आता पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस पाहायला मिळत आहे. स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरचे जिल्हे दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी स्वत:पुरते आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले, परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे मंत्र्यांचं म्हणण आहे.

भाजपच्या २० पैकी ७ आणि शिवसेनेच्या १२ पैकी ७ मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० पैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे. तर आदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता,त्यावर आता स्थगिती आलीय.

राष्ट्रवादीच्या कुणाला किती लांबवरचा जिल्हा मिळालाय?

१.कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना ६२५ किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे...

२.नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना १९५ किमीवरचा नंदूरबार जिल्हा मिळाला

३.साता-याचे मकरंद पाटील यांना ४४० किमीवरचा बुलढाणा जिल्हा दिला गेलाय

४.नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना ४४५ किमीवरचा हिंगोली जिल्हा दिला गेलाय

५.लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना ६३६ किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेलाय

स्वजिल्हे मिळालेले मंत्री

भाजप

१.चंद्रशेखर बावनकुळे -नागपूर

२.राधाकृष्ण विखे पाटील-अहिल्यानगर

३.आशिष शेलार-मुंबई उपनगर

४.जयकुमार रावल-धुळे

५.निलेश राणे-सिंधुदूर्ग

६.पंकज भोयर-वर्धा

७.मेघना बोर्डीकर-परभणी

शिवसेना

१.एकनाथ शिंदे-ठाणे

२.गुलाबराव पाटील-जळगाव

३.संजय राठोड-यवतमाळ

४.उदय सामंत-रत्नागिरी

५.संजय शिरसाठ-संभाजीनगर

६.शंभुराज देसाई-सातारा

७.प्रकाश आबिटकर-कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस

१.अजित पवार-पुणे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू