Congress Maharashtra Candidates List 
ताज्या बातम्या

Loksabha Election : काँग्रेसनं महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावं केली जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली संधी

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

Published by : Naresh Shende

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. नंदूरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीसाठी बलवंत वानखेडे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी कळगे, तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने राज्यातील उमेदवारांची पहिलीच यादी जाहीर केली असून, काँग्रेसची या निवडणुकीसाठी रणनीती काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

आता 'कसबा पॅटर्न' नाही, 'पुणे पॅटर्न' येणार - रवींद्र धंगेकर

पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिली, यावेळी ते म्हणाले, "मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिलीय. त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेल. भाजपचे मुरलीधर मोहोळ तुमच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत, हे तगडं आव्हान आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना धंगेकर म्हणाले, माझ्या राजकीय जीवनाच्या ३० वर्षांच्या कालवधीतील ही दहावी निवडणूक आहे. आतापर्यंत मी महापौर, उपमहापौरसाठी माझ्या निवडणुका झाल्या. मला जनतेनं कौल दिलं हे मागच्या वेळी पाहिलं आहे. चारवेळा स्थायी समितीचे जे अध्यक्ष होते, त्यांचाही मी पराभव केला आहे."

"भाजपचे महानगरपालीकेचे चेअरमनही माझ्याकडून पराभूत झाले आहेत. पुणेकरांना आमच्या विकासाबाबत माहित आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या काळात दिसेल. मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर जिंकतील हा माझा विश्वास आहे. पुण्यात अनेक समस्या आहेत. पुण्यातील वाहतुकीची समस्या, अंमली पदार्थांना व्यसनाधीन झालेले तरुण, तसंच पुण्यात पायाभूत सुविधा अपूऱ्या पडत आहेत, हे विषय फक्त काँग्रसच सोडवू शकतो, असा माझा विश्वास आहे. पुढील ५०-५५ दिवसांत पुणे पॅटर्न दिसेल. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत जनता उभी राहिल, असा माझा विश्वास आहे", असंही धंगेकर म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज लोकशाहीशी बोलताना म्हणाले, इच्छेप्रमाणे जे काही व्हायलं पाहिजे, ते होत आहे, असं मला वाटतय. जनतेच्या सेवेसाठी मला काहीतरी करता येईल. कोल्हापूरकरांसाठी चांगलं होईल, अशी मला खात्री आहे. उद्धव ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यांना मला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. कार्यकर्त्यांना एकप्रकारे त्यांनी सक्रिय केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक