Admin
ताज्या बातम्या

तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर टीकास्त्र

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. तेव्हा एका सभेला मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. ते म्हणाले की, “भारत-चीन सीमेवरील चिनी घुसखोरी सरकार रोखू शकत नाही. संसदेत चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे काम करतात. आम्ही देशाबरोबर आहोत. मात्र, सरकार माहिती लपवत आहे,” असा शब्दात त्यांनी मोंदींवर टीका केली आहे.

तसेच आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?, असे म्हणत खरगे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!