ताज्या बातम्या

Rahul Gandhi Meet PM Modi : राहुल गांधी पंतप्रधानांच्या भेटीला; भेटण्याचे कारण काय?

पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.

Published by : Prachi Nate

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. 14 मे 2025 रोजी सीबीआय प्रमुख प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे ही भेट सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्या सीबीआय प्रमुखांच्या निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.

पहलगाममधील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून दिलं. एवढचं नाही तर पाकिस्तानचं पाणी देखील बंद केलं. त्यामुळे अनेक पाकिस्तानी मंत्र्यांकडून भारताला पोकळ धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत बैठक पार पाडली आहे. या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा