ताज्या बातम्या

"तुमचाही मुसेवाला करु..."; आता काँग्रेस खासदारालाही धमकी

लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी या धमकीच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

Published by : Sudhir Kakde

काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू यांना व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना एक मेसेज आला. यामध्ये असं म्हटलंय की, सिद्धू मुसेवाला सारखाच तुमचीही परिस्थिती होईल. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी या धमकीला दुजोरा दिला आहे.

मुसेवाला यांची 29 मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर 8 शार्पशूटर्सनी गोळीबार केला. आज काँग्रेस नेते राहुल गांधी हेही मुसेवाला यांच्या कुटुंबीयांना भेटायला आले होते. मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 8 शार्पशूटरपैकी तीन पंजाबचे असल्याचे सांगण्यात येत होतं. याशिवाय हरियाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि राजस्थानमधील एक आहे.

मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी भगवंत मान सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली होती. बिट्टूशिवाय बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही धमकीचं पत्र आलं होतं. या पत्रात लिहिलं होतं की, सलमान खान, सलीम खान लवकरच तुमचाही मूसेवाला करु. त्याखाली जी.बी. आणि एल.बी. होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा