ताज्या बातम्या

काँग्रेसमध्ये फडकले बंडाचे निशाण; लिंगाडेच्या उमेदवारीनंतर प्रजापतींचा राजीनामा

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष शाम जगमोहन प्रजापती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितले होती.

Published by : Sagar Pradhan

अमरावती|सुरज दाहाट: विभागीय पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसने शिवसेनेचा (ठाकरे गट) उमेदवार आयात करून बुलढाण्याच्या धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी बंड करत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा शहराध्यक्ष बबलू शेखावत यांना पाठवला आहे. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करत आपण काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असं त्यांनी जाहीर केले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष शाम जगमोहन प्रजापती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितले होती. त्यांच्यासोबतच माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे, यवतमाळचे डॉ. महेंद्र लोढा, भैयासाहेब मेटकर यांनीही उमेदवारी मागितल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. मात्र काँग्रेसने अनेक वर्षांपासून पक्षात असणाऱ्या उमेदवारांना डावलून बुलढाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एक मोठा गट या निर्णयाने नाराज झाला आहे. काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असून त्या कलहाचा उद्रेक श्याम प्रजापती यांच्या राजीनामे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी पदवीधरांचे प्रश्न आपण सर्वकश शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र आपण काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नमूद केले. मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता असून शेवटपर्यंत काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहील असेही त्यांनी जाहीर केला आहे.

का दिला राजीनामा?

काँग्रेस पक्षाकडे पक्षातील सहा जणांनी उमेदवारी मागितली होती. मात्र यातील काँग्रेसने कोणालाही उमेदवारी न देता बुलढाणा येथील धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित पणे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसशी प्रामाणिक असलेला एक मोठा वर्ग पक्षाच्या या निर्णयावर नाखुश आहे. या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी असल्याचेही समोर येत आहे. याच निर्णयाचा परिणाम म्हणून श्याम प्रजापती यांनी आपल्या पदवीधर सेलचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

विचारांनी काँग्रेसमध्येच - प्रजापती

काँग्रेस पदवीधर सेलच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांनी तो राजीनामा स्वीकारावा अशी विनंती करण्यात आली आहे. केवळ पदाचा राजीनामा दिला असला तरी मनाने आणि विचाराने आपण काँग्रेसमध्ये आहोत अशी प्रतिक्रिया श्याम प्रजापती यांनी दिली आहे. लवकरच आपण सहयोगी संघटनांच्या मदतीने पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचेही प्रजापती यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश