Mumbai Congress Protest : काँग्रेसचं आज मुंबईत आंदोलन Mumbai Congress Protest : काँग्रेसचं आज मुंबईत आंदोलन
ताज्या बातम्या

Mumbai Congress Protest : काँग्रेसचं आज मुंबईत आंदोलन, डॉ.संपदा मुंडेंना न्याय मिळण्यासाठी आंदोलन

साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

  • या घटनेनं फक्त साताराच नाही, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

  • आता या प्रकरणावरून राजकीय पातळीवरही आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत.

Phaltan Doctor Suicide : साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं फक्त साताराच नाही, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून राजकीय पातळीवरही आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत.

फलटणमधील एका हॉटेलच्या रूममध्ये ही महिला डॉक्टर मृतावस्थेत सापडली. ती दोन दिवसांआधी हॉटेलमध्ये आली होती. दिवसभर दरवाजा न उघडल्यानं कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा उघडला असता ही धक्कादायक घटना उघड झाली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली, ज्यात तिने दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. त्याचपार्श्वभूमीवर महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा