MNC-Congress : मनसे-ठाकरे युतीवर काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका; महाविकास आघाडीत सामील होणार का? MNC-Congress : मनसे-ठाकरे युतीवर काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका; महाविकास आघाडीत सामील होणार का?
ताज्या बातम्या

MNC-Congress : मनसे-ठाकरे युतीवर काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका; महाविकास आघाडीत सामील होणार का?

मनसे-ठाकरे युतीवर काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका; महाविकास आघाडीत सामील होणार का?

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या एक नवा समीकरणाचा खेळ सुरू आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या चर्चांनी रंगत वाढवली आहे, तर काँग्रेसनेही या घडामोडींवर आपले पहिले स्पष्ट संकेत दिले आहेत. पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत राज्यातील सद्यस्थितीपासून ते आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली, आणि त्यात मनसे-ठाकरे गटाच्या युतीचाही मुद्दा आला.

मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत विचारणा झाल्यावर चेन्निथला यांनी एक वाक्यात भूमिका मांडली – “दोन भाऊ एकत्र येत असतील आम्हाला काही अडचण नाही, मात्र मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही तो निर्णय आम्ही चर्चेनंतर घेऊ.” विजय वडेट्टीवार यांनीही साधारण त्याच भूमिकेला दुजोरा देत स्थानिक स्वराज्य निवडणुकांत एकत्र येण्यास विरोध नसल्याचे सांगितले.

यावरून काँग्रेसला मनसे-ठाकरे गटाच्या जवळिकीबाबत उघडपणे आक्षेप नाही, हे स्पष्ट झाले असले तरी मनसेला महाविकास आघाडीत औपचारिक स्थान मिळणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. शिवसेना (ठाकरे गट) आधीपासूनच महाविकास आघाडीचा घटक आहे, त्यामुळे मनसेला सामील करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकमताने संमती आवश्यक राहील.

येथेच राजकीय पेच निर्माण होतो. जर मनसे-शिवसेना युती झाली पण महाविकास आघाडीने मनसेला सामील करून घेतले नाही, तर मनसेसाठी जागा वाटपात अडचणी निर्माण होतील. महाविकास आघाडीत जागा मिळाल्यास वाटपात थेट सहभाग असेल, परंतु सामील न झाल्यास शिवसेनेला आपल्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्या लागतील.

यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत अंतर्गत ताण वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मनसेसाठी हा केवळ युतीचा प्रश्न नाही, तर राजकीय अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. काँग्रेसची सध्या “वेट अँड वॉच” भूमिका आहे, पण पुढील काही आठवड्यांत घेतले जाणारे निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाला नवी दिशा देऊ शकतात. हे चित्र पाहता, आघाड्यांची गणिते, युतीचे राजकारण आणि जागावाटपातील तडजोडी या सगळ्यांतून राज्यातील राजकीय चुरस आणखी तीव्र होणार, यात शंका नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut Nashik : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी प्रकरणी राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाले की....

Prajakta Gaikwad And Shambhuraj Khutwad : तुमच्यासाठी काही पण! तिच्या होकारासाठी पैलवानानं चक्क नॉनव्हेज सोडलं

Odisha News : ओडिशामध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाचा नवा अध्याय; केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन प्रकल्पांना मंजुरी

Kabutarkhana Andolan : 'जैन समाजावर का कारवाई केली नाही?' मराठी एकीकरण समितीचा पोलिसांना सवाल