एसटी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून महामंडळाला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 21 विभागांसाठी विभागनिहाय निविदा प्रक्रिया राबवून 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एकनाथ शिंदे फेब्रुवारी २०२४मध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर आता एसटी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा रद्द करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या 1 हजार 310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.