ताज्या बातम्या

Double Decker AC Buses: बेस्टकडून 700 एसी डबल डेकर गाड्यांचं कंत्राट रद्द

बेस्टकडून 700 एसी डबल डेकर गाड्यांचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. बेस्टकडून संबंधित कंपनीची अनामत रक्कम देखील गोठवण्यात आल्याची माहिती आहे.

Published by : Dhanshree Shintre

बेस्टकडून 700 एसी डबल डेकर गाड्यांचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. बेस्टकडून संबंधित कंपनीची अनामत रक्कम देखील गोठवण्यात आल्याची माहिती आहे. मागील एका वर्षात करार असलेल्या कंपनीकडून एकही गाडी दाखल न झाल्यानं कंत्राट रद्द केल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती आहे. बेस्टला प्रवाशांच्या सोईसाठी आणखी 3 हजार गाड्यांची गरज असताना कंत्राट रद्द केल्यानं प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या कंपनीकडून जवळपास 200 डबल डेकर गाड्यांचा बेस्ट सोबत करार आहे. यातील 50 गाड्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित 150 गाड्या लवकरच ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 700 गाड्यांचं कंत्राट रद्द झाल्यानं प्रवाशांची परवड होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात आजच्या घडीला एकूण 3 हजार 40 गाड्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा