थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
विक्रोळी पार्कसाईट मध्ये मुंबई मनपाचा इमारती च्या पुनर्विकास वरून वाद निर्माण झाला आहे. या इमारती धोकादायक झाल्याने पालिकेने या ठिकाणी पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र इथेच ट्रांझिस्ट मिळावे आणि लेखी इथेच पुनर्विकास होणार , कधी होणार हे लेखी द्यावे अशी मागणी रहिवाश्यांची आहे. मात्र पोलीस आणि पालिकेने या ठिकाणी आज इथे बळाचा वापर करीत या इमारतीचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र याला विरोध करीत पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली.
इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाश्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र स्थानिकांचा याला विरोध , सरकार योग्य पद्धतीने लिहून देत नाही म्हणून नागरिकांचा विरोध केला. मात्र पालिकेच्यावतीने पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकाम्या करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी विरोध करीत निर्माण केली तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आला असून पोलिसांसोबत रहिवाशांची बाचाबाची कऱणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
थोडक्यात
विक्रोळी पार्कसाईटमध्ये मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासवरून वाद सुरु….
इमारती धोकादायक घोषित करून रहिवाश्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न…..
मात्र स्थानिकांकडून विरोध ....