ताज्या बातम्या

कोरोनाचे संकट; पुढचे ४० दिवस अतिमहत्वाचे, वाचा सविस्तर

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत.कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासात 141 रुग्ण बरे झाले आहेत तर गेल्या 24 तासात 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 3,468 कोविड रुग्ण उपचाराधीन आहे. गेल्या 24 तासात 1,34,995 चाचण्या करण्यात आल्या. कोरोना व्हायरस भारतात पोहोचण्यास 30 ते 35 दिवस लागतात. त्यानुसार जानेवारी महिना महत्त्वाचा आहे.

भारतासाठी पुढचे 40 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. गेल्या दोन दिवसांत विमानतळांवर 6000 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 32 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. ओमिक्रॉन सब व्हेरिएंट BF.7 आला तर, कोरोना केसेस अचानक वाढू शकतात. याशिवाय नाकाद्वारे दिली जाणारी लस बाजारात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'