(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.
देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्ण आहेत. जानेवारीपासून कोरोनामुळे 28 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या 2 दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
जानेवारीपासून राज्यात 9592 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.