(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतात 1000 हून अधिक सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.
भारतात 1010 हून अधिक सक्रिय कोरोनाबाधितांची नोंद झाली असून महाराष्ट्रात सध्या 383 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. केरळमध्ये एकूण 430 कोरोना रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 335 नवीन रुग्णांचा समावेश आहे.