(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतात 1000 हून अधिक सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.
देशात कोरोनाचे तब्बल 1 हजार 252 रुग्ण असून केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण आहेत. कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा दुसरा नंबर असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात 383 रुग्ण असून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे