ताज्या बातम्या

BMC Election : मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्याचे लक्ष नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. महापालिका निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून आता महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट आली आहे.

१४ डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या १५ डिसेंबरनंतर या निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. आचारसंहिता निवडणुकीच्या घोषणेसोबच लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती समोर आली आहे. राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनआगामी १५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

२७ महानगरपालिकांमध्ये मार्ग मोकळा

नागपूर आणि चंद्रपूर येथे राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकांसाठी कधी होणार मतदान?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. २०१७ मध्ये घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांहून अधिक अंतर होतं. मात्र यावेळी एका महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, हा अनुभव लक्षात घेऊन १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी अशा दिवशी मतदान होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा