थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Abdul Sattar) छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. प्रचाराच्या शेवटच्या सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांवर रामबाण उपाय करण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
याप्रकरणी सी-विजिल ॲप व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने सिल्लोड न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व अन्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप
आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस
सत्तारांसह,जिल्हाधिकारी आणि 3 अधिकाऱ्यांना नोटीस