Ram Gopal Verma 
ताज्या बातम्या

Ram Gopal Varma Sentenced Jail : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय?

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना मुंबई न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Published by : Gayatri Pisekar

चित्रपट निर्मात आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नुकतंच सत्या चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर तो मुंबईत दिसला. या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान राम गोपाल उपस्थित होते. ते नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र, आता ते एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांना तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्री' नावाच्या चित्रपटाने चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अलीकडच्या काळात राम गोपाल वर्मा यांचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांचे मागील काही चित्रपट देखील चांगली कामगिरी करू शकले नाहीत. तसेच या प्रकरणामध्ये २०२२ साली ५००० रुपयांच्या जात मुचलक्यावर सोडण्यात आलं होतं.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात आता राम गोपाल वर्माला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २१ जानेवारी मंगळवारी या प्रकरणी न्यायालयात त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र ते न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपी राम गोपाल वर्माला निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत तक्रारदाराला ३.७२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या कायद्याअंतर्गत अपुऱ्या निधी अभावी चेक बाऊन्स प्रकरण किंवा मान्य देय रक्कम न देणे या प्रकरणात कारवाई करण्यात येते. त्यानुसार राम गोपाल वर्मा यांच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

संपूर्ण बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा