(Covid 19 Cases ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतात 1000 हून अधिक सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्र 209 रुग्णांची संख्या असल्याची माहिती मिळत आहे.
केरळमध्ये 430 रुग्ण आहेत तर दिल्ली 104 रुग्णसंख्या आहेत. यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा अशा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.