थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Madhuri Elephant) माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मिळत आहे. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी मिळाली असून यासंदर्भात उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत सुनावणी पार पडली.
माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली. पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यात मंजुरी मिळाली असून माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दल ही सुनावणीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत सोमवारी उच्चस्तरीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या त्यामुळे आता माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Summery
माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा
मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास मिळाली परवानगी
उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत झाली सुनावणी