crime Team Lokshahi
ताज्या बातम्या

Crime | प्रेमात हरल्याने प्रेमवीराने बंदुकीच्या गोळ्यावर लिहिले मरणाऱ्याचे नाव

बिहारमध्ये प्रेमवीराने मुलीच्या कुटुंबीयास ठेवले दिवसभर ओलीस

Published by : Lokshahi News

प्रेम माणसाकडून काय करून घेईल हे कधीच सांगता येत नाही. प्रेमात प्रचंड ताकद असते असं म्हणतात पण प्रेम (Love) तुमच्याकडून गंभीर गुन्हे घडवू शकेल एवढी नकारात्मक ताकदही देऊ शकतं हेही तितकंच खरं. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) घडला आहे. बिहारमधल्या पाटणमध्ये एका मुलाची एका मुलीसोबत मैत्री होती. काही वर्षांच्या मैत्रीनंतर अचानक मुलगी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्याने या संतापलेल्या प्रेमवीराने मुलीच्या घरात घुसून तिच्या कुटुंबियांना दिवसभर ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) म्हणून दारात आलेल्या या तरुणाने मुलीच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडताच घरात प्रवेश केला आणि घरातील सगळ्यांना बंदुकीचा (Gun) धाक दाखवत ओलीस धरले त्यानंतर त्याने आपली मागणी कुटुंबीयांसमोर ठेवली. या तरुणाने त्याच्यासोबत आणलेल्या बंदुकीतील गोळ्यांवर रितसर कुठल्या गोळीने कोण मारणार याची नावे लिहिली होती. पहिली गोळी प्रेयसीच्या नावावर, दुसरी गोळी तिच्या वडिलांच्या नावावर, तिसरी गोळी मुलीच्या भावाच्या नावावर आणि चौथी गोळी स्वतःसाठी ठेवून सगळी व्यवस्था करून हा तरुण मुलीच्या घरी गेला होता. सोबत जाताना त्याने एल दोरी , पेट्रोलच्या दोन बाटल्या, साखळी अशा वस्तूही सोबत घेतल्या होत्या.

घरात अचानक घुसलेल्या या तरुणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला केला पण या मुलाकडे जीवघेणी हत्यारे असल्याने त्या सगळ्यांचा नाईलाज झाला होता. अनेक तास हा थरार त्या घरामध्ये चालू होता. सुरुवातीला या मुलीच्या कुटुंबियांना हा तरुण असे नेमके करत आहे हेच समजले नाही पण त्या तरुणाकडे आपली मुलगी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबियांना धक्का बसला.

मात्र दिल्लीमध्ये (Delhi) असणाऱ्या संबंधित मुलीने फोन करून पोलिसांना या प्रकाराची माहिती आधीच दिली होती. त्यामुळे काही पोलीस (Police) साध्या वेशात मुलीच्या घराजवळ दाखल झाले होते. सिनेस्टाइल थरार सुरु असल्याने काही पोलीस पत्रकार (Journalist) (असल्याचे सांगून घरात घुसले आणि त्याचवेळी काही पोलीस घराबाहेर बंदुका ताणून उभे होते. दरम्यान दिवसभर चाललेल्या या थरारानंतर हा आरोपी तरुण थकला आणि त्याने ग्लुकोजची (glucose) मागणी सध्या वेशातील पोलिसांकडे केली. पोलिसांनी हीच संधी साधून या तरुणाला पकडले आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले. या प्रकरणात त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या तरुणाने सांगितले की याच घरातील एका मुलीसोबत त्याची मैत्री होती. तिने त्याच्याशी लग्न करण्याचे वचनही त्या तरुणाला दिले होते. पण अचानक त्या मुलीने या मुलाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि संतापाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे या तरुणाने पोलिसांना सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?