ताज्या बातम्या

धक्कादायक; जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन् विनयभंग केला; काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

महिलांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. यातच आता दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महिलांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. यातच आता दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका काँग्रेस नेत्याने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या रेवाडीतील काँग्रेस नेते महाबीर मसानी यांच्यावर तरुणीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महाबीर मसानी हे काँग्रेस नेते आहेत. ज्यांनी स्वत:वरील आरोपांवर माध्यमांसमोर काहीही सांगितले नाही. मात्र, एका षड्यंत्राखाली त्यांच्यावर आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस तपासात सत्य बाहेर येईल, अशी माहिती डीएसपी मोहम्मद जमाल यांनी दिली आहे.

रेवाडी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, महाबीर मसानी यांनी शहरातील अभय सिंह चौकातून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिचा विनयभंग केला. तसेच जातीयवादी शब्द बोलून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून गुन्हा दाखल केला आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."