Kolhapur Crime Kolhapur Crime
ताज्या बातम्या

Kolhapur Crime : अर्धा गुठ्यांसाठी मुलाने घेतला जन्मदात्यांचा जीव! डोकं फोडले, विळ्याने मान चिरली तर, काचेने नसा...

कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने घराच्या वाटणी करण्याच्या कारणावरुन जन्मदात्या आई-वडीलांची निर्घुण हत्या केली.या घटनेमुळे कोल्हापूरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

Published by : Riddhi Vanne

(Kolhapur Crime) कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने घराच्या वाटणी करण्याच्या कारणावरुन जन्मदात्या आई-वडीलांची निर्घुण हत्या केली.या घटनेमुळे कोल्हापूरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. माथेफिरुने आई-वडीलांच्या डोक्यात बांबूने मारले तसेच विळ्याच्या पात्याने मानेवर वार केले आणि काचेच्या तुकड्याने हाताच्या नसा कापल्याची घटना घडली. नारायण गणपतराव भोसले (वय ८२), विजयमाला नारायण भोसले (७०) अशी मृत वयोवृद्ध दाम्पत्यांची (Crime News) नावे आहेत. या प्रकरणी आरोपी सुनील नारायण भोसले (४८, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील आरोपी सुनील नारायण भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्धा गुंठ्यासाठी त्याने असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

नेमकं प्रकरण काय?

हुपरीताल महावीरनगरमध्ये नारायण भोसले आणि पत्नी विजयमाला हे दोन्ही दाम्पंत्य राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील दोन मुलं कामानिमित्त नेहमी बाहेरगावी होती, मात्र सुनील हा त्यांच्यासोबत पण घरासमोरच्या पत्राच्या शेडमध्ये राहत होता, रोज रोज आई-वडीलांसोबत सुनील भांडण करत असे, तसेच कधी-कधी शिवीगाळ करत त्यांना मारहाण सुद्धा करत होता. त्यांनतर वाटणीच्या वादावरुन आई-वडीलांचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार....

वडिलांच्या डोक्यात लाकडाने मारले. त्या मारहाणीमध्ये शोकेसची काच फुटली. त्याच काचेने त्याने आई-वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यामुळे दोघेही रक्त बांबाळ झाले, दरम्यान आईच्या अंथरुणात तिचं मंगळसुत्रे तुटले आणि बांगड्या फुटल्या होत्या. सर्व झाल्यावर त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि घराच्या जवळ बसला. घराजवळ येणाऱ्या व्यक्तीला दगड मारण्याची धमकी देऊ लागला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा