ताज्या बातम्या

इस्लामपूर हादरले; कुख्यात गुन्हेगार नितीन पालकरवर धारदार शस्त्राने वार

इस्लामपूर शहरातील बाजारपेठेच्या परिसरात बुधवार, २४ एप्रिल रोजी दुपारी सुमारास घडलेल्या एका हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

Published by : Rashmi Mane

इस्लामपूर शहरातील बाजारपेठेच्या परिसरात बुधवार, २४ एप्रिल रोजी दुपारी सुमारास घडलेल्या एका हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे १.३० वाजता बाजारात पानपट्टीजवळ असताना एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख नितीन संजय पालकर (वय अंदाजे ४०) अशी झाली असून, तो स्थानिक पोलीस रेकॉर्डवरील एक सक्रिय गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वी खंडणी, मारहाण, हल्ला व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. काही काळापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे. याप्रकरणी पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत असून, घटनेच्या पार्श्वभूमीवर काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा