श्रावण आणि गणेशोत्सव यामुळे ओस पडलेले मच्छीबाजार आज पुन्हा गजबजले आहेत. गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्यखवयांनी पाठ फिरविली होती. मात्र, काल गणपती विसर्जन झाल्यानंतर आणि आज पहिलाच रविवार आल्यामुळे मासे बाजारात गर्दी पाहायला मिळाली.
माशांचे दरही त्यामुळे वधारले होते. पापलेट 1600 रुपये किलो, सुरमई 1300 रुपये, मोरी मासा 600 ते 800 रूपये किलो तर बांगडे 300 ते 400 रुपये किलो अशा दराने विकले गेले. माशांचे दर वाढलेले असूनही खवय्यानी ते खरेदी केल्याचे पाहायला मिळत आहे.