सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण आता गावाकडे जातात. महत्त्वाचं म्हणजे याच काळात डोंगरातील अस्सल रानमेव्याचाही मोसम सुरू होतो. त्यामुळे, करवंदं, जांभळं आणि इतरही रानमेवा विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेकजण येतात.
महाराष्ट्रातील अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला आता हा रानमेवा मिळू लागलाय. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला निसर्गाच मोठं वरदान लाभलंय. चारी बाजूंनी डोंगर आणि एखाद्या द्रोणात ठेवावं अशी गावं.. डोंगरावर घनदाट जंगल... या जंगलांमध्ये औषधी वनस्पतीसोबतच अनेक गावरान फळे आणि फुलेही सापडतात. त्याचप्रमाणे यंदा जंगलाची काळी मैना म्हणून ओळखले जाणारी करवंदं बाजारात विक्रीसाठी आले आहेत. जांभूळ, तोरण, आळू तसेच कोकम यासारखी असंख्य फळंही मिळू लागलीयत. त्यासाठी अनेक शेतकरी जंगली प्राण्याची दहशत असूनही भल्या पहाटे डोंगरात जातात आणि हा रानवेमा आणतात.
महिला विक्रेत्या लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे म्हणाल्या की, "करवंद असो की जांभळं किंवा आणखी कुठलाही रानमेवा. तो काढताना अनेकदा इजा होण्याचीही भीती असते. मात्र तरीही हे शेतकरी बांधव रानवेमा काढत असतात".
महिला विक्रेत्या लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे म्हणाल्या की, "हल्ली बाजारात काहीही घ्यायचं म्हटलं की त्यात भेसळ असण्याचा धोका असतो. अनेक फळं पिकवण्यासाठी केमिकलचाही वापर होतो. मात्र ही रानमेवा कोणतीही रासायनिक फवारणी न करता उगवलेला असतो. आणि ते पिकवण्यासाठी कोणतीही रासायनिक प्रकिया केलेली नसते".
पर्यटकांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला म्हणाले की, "आता शाळांना सुट्टी लागतील. मग पोरं-टोरं घेऊन अनेकजण गावाकडे जात असतात. त्यावेळी रस्त्यांने ही अशी करवंदं, जांभळं तसेच इतरही रानमेवा विकणारी माणंसं तुम्हाला दिसतील. तेव्हा थोडा वेळ काढा. हा रानमेवा नक्की विकत घ्या. त्यातून अस्सल गावरान चवही तुम्हाला मिळेल आणि या गोरगरीब विक्रेत्यांना दोन पैसेही मिळतील.