NIA ने आज पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल एका CRPF कर्मचाऱ्याला अटक केली. अटक झाल्यानंतर लगेच केंद्रीय राखीव पोलिस दलाने त्याला बडतर्फ केलं. एनआयएने म्हटलंय की, "आरोपी मोती राम जाट, जो CRPF मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदावर होता, तो हेरगिरीत सक्रियपणे सहभागी होता, 2023 पासून तो पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवत होता."