CSK vs GT, IPL 2024 
ताज्या बातम्या

'CSK'चा गुजरात टायटन्सवर ऐतिहासिक विजय, कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला,"धोनी आमच्यासाठी..."

गुजरातचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला आणि चेन्नईने या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला.

Published by : Naresh Shende

गतवर्षी आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात सलग दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केलीय. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज रचिन रविंद्रने ४६ धावांची धकाडेबाज खेळी केली. तसच शिवम दुबेच्या ५१ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेनं २०६ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची चेन्नईच्या गोलंदाजांची पुरती दमछाक केली. गुजरातचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला आणि चेन्नईने या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला.

काय म्हणाला कर्णधार ऋतुराज गायकवाड?

आजचा खेळ निश्चितच योग्य पद्धतीने खेळला गेला. गुजरातसारख्या संघाविरोधात आम्हाला अशाप्रकारची चमकदार कामगिरी करण्याची आवश्यकता होती. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. चेन्नईतील खेळपट्टी कशी असेल, याबाबत आम्हाला अंदाज नव्हता. प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याऐवजी आम्ही फक्त चांगल्या प्रदर्शनावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं होतं.

तुमच्याकडे शेवटच्या सत्रात विकेट्स हातात असतील, तर या खेळपट्टीवर मदत मिळते. रचिनने अप्रतिम फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला तगडं आव्हान दिलं. शिवम दुबेनं उल्लेखनीय कामगिरी केलीय. धोनीनं खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल चांगल्या पद्धतीने माहित असतं. धोनी आमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. मी त्यांच्या क्षेत्ररक्षणानेही प्रभावित झालो आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistani Actress Death : धक्कादायक! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार

Latest Marathi News Update live : निकेत कौशिक मिरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार

Sharad Pawar : शिक्षक आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा; शासनाच्या उदासीनतेवर केली तीव्र शब्दांत टीका