ताज्या बातम्या

डाळिंबाच्या शेतीत गांजाची लागवड; पोलिसांनी केला 13 लाख 40 हजारचा गांजा जप्त

सांगलीच्या जत तालुक्यातील माणिकनाळ येथे डाळिंब बागेत गांजा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून 133 किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 13 लाख 40 हजारचइतकी होते. याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बगली फरार आहे.

Published by : Team Lokshahi

संजय देसाई, सांगली

सांगलीच्या जत तालुक्यातील माणिकनाळ येथे डाळिंब बागेत गांजा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून 133 किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 13 लाख 40 हजारचइतकी होते. याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बगली फरार आहे.

जत कर्नाटक सीमावर्ती भागातील माणिकनाळ येथे डाळिंबाच्या बागेत बगली यांनी बेकायदेशीर गांजा लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी माहिती मिळाली होती. याबाबत पवार यांनी पोलीस उपाअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. यावेळी डाळींब बागेत गांजाची 5 ते 7 फुट उंचीची झाडे शेतातून बाहेर काढत जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 133 किलो झाले. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात दोन लाख 57 हजार रुपये किमतीचा गांजा सापडला होता. 25 किलो 700 ग्रॅम इतक्या वजनाचा हा गांजा होता. त्यानंतर उमदी पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.

सद्यस्थितीत बाजार भावाप्रमाणे या गांजाची किंमत 13 लाख 40 हजार इतके आहे. सदर आरोपी फरार असून त्यांचा शोध उमदी पोलीस करत आहेत. यापूर्वी 2017 मध्ये उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी करजगी येथे उसाच्या शेतात केलेला सुमारे दीड कोटीचा गांजाची झाडे जप्त केली होती ही झाडे अक्षरशा दोन ट्रॅक्टर मधून आणली गेली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली