ऐन श्रावणात डाळींपाठोपाठ कडधान्यांच्या किमतीत वाढ

ऐन श्रावणात डाळींपाठोपाठ कडधान्यांच्या किमतीत वाढ

श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहणींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महागाईमुळे तर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहणींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महागाईमुळे तर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

तूरडाळीचा भाव सर्वाधिक वाढला असून, किलोमागे ती २० ते ३० रुपयांनी महागली आहे. याशिवाय बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.

किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शंभरी पार पोहोचले आहेत.

तूरडाळ : १०० ते १४०-१४५

मुगडाळ : १०४ ते १२०

चणाडाळ : ७० ते ८०

मसूर डाळ : ९६-११२

कडधान्याचे भाव (रुपयांत)

मूग : १०० ते १२०

मटकी : १०० ते १४०

चणे : ६८ ते ७२

वाटाणा : ६० ते ८०

काबुली चणे : ९० ते १२०

वाल : १८० ते १९०

ऐन श्रावणात डाळींपाठोपाठ कडधान्यांच्या किमतीत वाढ
Nitin Gadkari : नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा म्हणाले...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com