Ganeshotsav State Festival : सार्वजनिक गणेशोत्सव आता "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव" विधानसभेत सांस्कृतिकमंत्र्याची घोषणा Ganeshotsav State Festival : सार्वजनिक गणेशोत्सव आता "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव" विधानसभेत सांस्कृतिकमंत्र्याची घोषणा
ताज्या बातम्या

Ganeshotsav State Festival : सार्वजनिक गणेशोत्सव आता "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव" विधानसभेत सांस्कृतिकमंत्र्याची घोषणा

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव"म्हणून ओळखला जाणार अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

Published by : Riddhi Vanne

Ashish Shelar on Ganeshotsav State Festival : पुढील महिन्यात आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून आगमनापूर्वीच बाप्पांना आणि सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती सणाला आता "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव" म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

यंदा गणपती बाप्पा 27 ऑगस्ट दाखल होणार असून त्या निमित्ताने बाजारात लोकांची लगबग पाहायला मिळत आहे. ठिकठिकणी गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळाची जोरदार तयारी सुरु आहे. बाजारपेठा बाप्पाच्या मूर्तींनी तसेच सजावटीच्या वस्तूंनी सजलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासणे यांनी गणपती सणाचे महत्व विशद करत सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा. तसेच यासाठी निधी उपलब्ध करून दिला जावा अशी मागणीही केली. त्यांच्या या मागणीला उत्तर देताना आशिष शेलार यांनी सांगितले की ," 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो महाराष्ट्राचा अभिमान आहे.महाराष्ट्राचा गौरव आहे. जगात गणेशोत्सवाची व्याप्ती वाढावी आणि प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव"म्हणून ओळखला जाणार अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.

गणेशोत्सवासारख्या सणांवर आधीच्या सरकारने स्पीडब्रेकर लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आताच्या सरकारने ते स्पीडब्रेकर दूर केले. पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे अशी मागणी सरकारने न्यायालयासमोर मांडली असून राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे अडथळा आणणार नाही ” असेही आशिष शेलार यांनी यावेळी नमूद केले. या बातमीमुळे यंदाच्या गणपती उत्सवाला एक वेगळाच आनंदाचा रंग चढणार यात शंका नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shahapur : शहापूरमधील R.S दमानिया स्कूल प्रकरण; फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल