ताज्या बातम्या

चलन बातमी: रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटासंबंधी समोर आणली अनोखी बातमी

रिझर्व्ह बँकेकडून समोर आलेल्या माहितीनुसार असे समोर आले कि, ३१ मार्च २०२२ च्या व्यवस्थेत २००० च्या नोटांचे योगदान फक्त १३.८ टक्के इतकेच आढळून आले.

Published by : Team Lokshahi

८ नोव्हेंबर २०१६ ला झालेल्या नोटबंदी नंतर देशभरात बरेच फेरबदल घडून आले, त्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण देशभरातील जनतेवर झाला.देश डिजिटल होऊ लागला, देशात डिजिटल पेमेंटचे वारे वाहू लागले. रिझर्व्ह बँकेकडून सध्या ५ रुपये,१० रुपये, २० रुपये, 50 रुपये, १०० रुपये,२०० रुपये, ५०० रुपये, २००० रुपये चलनात जारी करण्यात आल्या. नोटाबंदीदरम्यान ५०० आणि १०० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या, त्याजागी ५०० आणि २००० च्या नवीन नोटा चलनात जारी करण्यात आल्या.

त्यांनंतर आता चलनासंबंधी नवीन बातमी समोर येतेय. चलन व्यवस्थेत बदल व्हावा म्हणून २०००ची नोट जारी करण्यात आली, परंतु चलनात आणलेल्या २००० चा वापर फार दुर्मिळ पाहायला मिळाल्या. आणि आरटीआय कडून मिळालेल्या माहितीतून असे समोर आले कि,२०१९-२०, २०२०-२१,२२०२१-२२ या तीन वर्षाच्या कालावधीत २००० च्या एकाही नोटेची छापणी करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेकडून समोर आलेल्या माहितीनुसार असे समोर आले कि, ३१ मार्च २०२२ च्या व्यवस्थेत २००० च्या नोटांचे योगदान फक्त १३.८ टक्के इतकेच आढळून आले.

नोटाबंदी दरम्यान बनावट नोटांचा बराच कारभार समोर आला,याच बनावट नोटा लक्षात घेता २०१८ मध्ये हे प्रमाण ५४ हजार ७७६ इतके होते तर, तर २०१९ मध्ये ते प्रामाण ९० हजर ५६६ इतके झाले, त्याचप्रकारे २०२० मध्ये हे प्रमाण ४४ हजार ८३४ इतके झाले,हाच विचार लक्षात घेऊन चलन व्यवस्थेत फेरबदल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय जारी केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा