Gmail : Gmail वरील 'हे' बटण धोकादायक; फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या 'या' टिप्स Gmail : Gmail वरील 'हे' बटण धोकादायक; फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या 'या' टिप्स
ताज्या बातम्या

Gmail : Gmail वरील 'हे' बटण धोकादायक; फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या 'या' टिप्स

ईमेल सुरक्षेचा सल्ला: 'Unsubscribe' बटणाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जाणून घ्या सुरक्षिततेचे उपाय.

Published by : Riddhi Vanne

Gmail किंवा इतर ईमेल प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रोजच्या प्रमोशनल किंवा स्पॅम ईमेल्सपासून सुटका मिळवण्यासाठी आपण सहजपणे ‘Unsubscribe’ बटणावर क्लिक करतो. पण आता याच Unsubscribe बटणाचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

नवीन प्रकारच्या सायबर स्कॅम Cyber Scam मध्ये फसवेखोर बनावट प्रमोशनल ईमेल Promtional Mail पाठवतात, ज्यात 'Unsubscribe' लिंक Link दिलेली असते. या लिंकवर क्लिक करताच तुमचा ईमेल आयडी Email ID "सक्रिय Active" असल्याचं त्यांना समजतं आणि मग ते तुम्हाला अधिकाधिक फसवणूक करणारे ईमेल Mail पाठवतात. बनावट नोकरीच्या संधी Job opportunities , खोटे डिस्काउंट ऑफर्स False discount offers, किंवा बँकेसंदर्भातील मेल्स Bank related mails. काहीवेळा तर हे लिंक मालवेअरने भरलेले असतात जे तुमच्या डिव्हाइसमधील संवेदनशील माहिती चोरण्यास सक्षम असतात.

या ईमेल्समधील ‘Unsubscribe’ लिंकमध्ये एक गुप्त ट्रॅकिंग कोड लपलेला असतो. तुम्ही क्लिक करताच तो कोड फसवेखोरांना तुमच्या ईमेल वापराबद्दल माहिती देतो. ही माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या डिव्हाईसला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:

1. अनोळखी ईमेलकडील लिंक टाळा: अनोळखी प्रेषकाचे ईमेल उघडू नका किंवा त्यामधील कोणतीही लिंक क्लिक करू नका.

2. स्पॅम म्हणून मार्क करा: अशा ईमेल्सना 'Spam' म्हणून मार्क करा.

3. ईमेल लपवण्यासाठी टूल्स वापरा: ‘Hide My Email’ सारख्या टूल्स वापरून तुमचा खरा ईमेल पत्ता सुरक्षित ठेवा.

4. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा: अँटीव्हायरस व ईमेल अ‍ॅप्स नेहमी अपडेट ठेवा.

5. लिंक क्लिक करताना विचार करा: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

थोडी सावधगिरी आणि सतर्कता आपल्याला या सायबर जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकते. त्यामुळे प्रत्येक क्लिक करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. 'Unsubscribe' सारख्या साध्या वाटणाऱ्या बटणामागेही फसवणुकीचा डाव लपलेला असू शकतो. त्यामुळे ईमेल वापरताना सतर्कता बाळगणे, शंका येताच योग्य निर्णय घेणे आणि आवश्यक ते सुरक्षात्मक उपाय करणे हीच काळाची गरज आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?