Cyclone Montha 
ताज्या बातम्या

Cyclone Montha : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर ‘मोंथा’चा तडाखा! ओडिशात मुसळधार पावसाचा हाहाकार; 15 जिल्ह्यांना फटका

पावसाचा 15 जिल्ह्यांना फटका बसला

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले

  • ओडिशात मुसळधार पाऊस

  • पावसाचा 15 जिल्ह्यांना फटका

(Cyclone Montha) मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हे वादळ पुढील काही तासांत कीनाडाजवळील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जाणार असल्याची माहिती मिळत असून या चक्रीवादळामुळे ओडिसात मुसळधार पाऊस सुरू झाला.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे मोंथा चक्रीवादळ आहे. किनारी आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडली. दक्षिण ओडिसातील 15 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच वाऱ्याचा कमाल वेग 90 ते 100 किमी प्रतितास असेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चक्रि‍वादळाच्या पार्श्वभूमीवर मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून किनारी भागात एनडीआरएफ पथके देखील सज्ज असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा