ताज्या बातम्या

Shakti cyclone : मुंबईसह कोकणात 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज

  • मुसळधार या जिल्ह्यामध्ये 4 ते 7 ऑक्टोबर पाऊस

  • 29 सप्टेंबर 2025 पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यातच आता राज्यावर पुन्हा संकट घोंगावतयं कारण आता हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला आहे.

यामध्ये हवामान विभागाने शक्ती चक्रीवादळाचा इशारा देत मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. दरम्यान मुसळधार या जिल्ह्यामध्ये 4 ते 7 ऑक्टोबर पाऊस, ताशी 45-65 किमी वेगाने वादळी वारे वाहतील समुद्रात लाटा उसळतील वाऱ्याचा वेग आणखी देखील वाढू शकतो.

या पार्श्वभूमीवर आयएमडीने समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मदत पथकांना सावद राहून मदतीस सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दरम्यान मराठावाडा आणि पुर्व विदर्भात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2025 पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा