ताज्या बातम्या

D Gukesh: बुद्धिबळ विश्वाचा नवा हिरा! सर्वात तरुण विश्वविक्रमी डी. गुकेश, आनंदनंतरचा विश्वनाथ...

डी. गुकेश: १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता! चीनच्या डिंग लिरेनवर थरारक मात करून भारताचा दुसरा जगज्जेता ठरला.

Published by : Team Lokshahi

भारताच्या गुकेश डोमराजूनने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर १४व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली आणि १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.

विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळ जगतात त्या प्रकारे वर्चस्व गाजवू शकेल असा कुणी भारतीय निर्माण होईल का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. गुकेशने १८व्या वर्षी थक्क करणारी प्रतिभा, परिपक्वता आणि धैर्य दाखवत या प्रश्नाचे उत्तर जगज्जेता बनूनच खणखणीत दिले.

सिंगापूरमध्ये झालेल्या या लढतीत १४व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता. लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?