ताज्या बातम्या

Supriya Sule : ‘दादा २८ तारखेला गेला, नाहीतर.., रेवती-सारंगच्या लग्नाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे नागपूरचे उद्योजक घराण्यातील सारंग लखानी यांच्याशी लग्न ठरले आहे.

Published by : Varsha Bhasmare

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे नागपूरचे उद्योजक घराण्यातील सारंग लखानी यांच्याशी लग्न ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. या आनंदवार्तेची पहिली अधिकृत माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यानंतर स्वतः सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंग यांचे काही खास फोटो शेअर करत ही बातमी अधिकृत केली. या घोषणेनंतर सुळे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची चर्चा सुरू होती. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात आणि कुटुंबीयांच्या संमतीनेच हे नाते ठरले. “माझे सहा भाऊ आहेत आणि सर्वांनी या नात्याला आशीर्वाद दिला. हे माझे भाग्य आहे की दादा असतानाच हे लग्न ठरले,” असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजित पवार यांची आठवण काढत भावनिक प्रतिक्रिया दिली. “दादा २८ जानेवारीला गेला, नाहीतर ३० जानेवारीला आम्ही संपूर्ण कुटुंबासह ही घोषणा केली असती. एकच समाधान आहे की दादाच्या आशीर्वादाने हे लग्न ठरले,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने वातावरण भावुक झाले.

कोण आहे सारंग लखानी?

रेवतीचा होणारा पती सारंग लखानी हा नागपूरचा रहिवासी असून तो प्रसिद्ध उद्योगपती अरुण आणि वंदना लखानी यांचा सुपुत्र आहे. अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आहेत. सारंग स्वतःही क्रीडाक्षेत्रात सक्रिय असून तो उत्तम बॅडमिंटनपटू असल्याची माहिती आहे. व्यवसाय आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याची ओळख आहे. रेवती सुळे या राजकीय वारसा असलेल्या घरातील असल्या तरी त्या सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण, संस्कार आणि कुटुंबीयांच्या संमतीने ठरलेले हे नाते दोन्ही कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण ठरला आहे. सध्या लग्नाचा मुहूर्त किंवा सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा