Tilak Pool
Tilak Pool Team Lokshahi
ताज्या बातम्या

दादरचा 'टिळक पूल आता दिसणार नव्या दिमाखदार अंदाजात

Published by : Team Lokshahi

एमएमआरडीए कडून लवकरच नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. दादर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पूलाचे आता नव्या भव्य स्वरुपात बांधकाम होणार आहे. वांद्रे सीलिंक च्या धर्तीवर महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा डेव्हलेपमेंट कॉपोरेशन (एमएमआरडीए) च्या मार्फत हा पूल उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून एमएमआरडीएला ३७४ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती समोर आली.

मुंबईची वाहतूक सुरळीतरित्या पार पडण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत व रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण ३४४ पुल आहेत. या पुलांच्या डागडूजीसाठी या सर्व पुलांचे वर्षातून दोनदा म्हणजेच पावसाळ्याआधी व पावसाळयानंतर असे ऑडीट पार पडले जाते. त्याचबरोबर अंधेरी येथील 'गोखले पूल' व सीएसएमटी स्थानकाजवळील 'हिमालय पूल' दुर्घटनेनंतर त्यां पुलांच्या डागडूजीचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले. 'टिळक पूल' हा तब्बल १०० वर्ष प्राचीन असून टिळक पुलाच्या बांधकामाला नव्याने आरंभ होणार आहे. धोकादायक घोषित केलेला 'टिळक पूल'आता लवकरच नव्या दिमाखात उभा राहणार आहे. मुख्यत: हा पूल वांद्रे सीलिंक च्या भूमीवर केबल आधारित असणार आहे.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित