Academy | Dangerous journey | police training team lokshahi
ताज्या बातम्या

बसच्या शिडीला लटकून अकॅडमीच्या युवकाचा घाटातून धोकादायक प्रवास

विद्यार्थ्यांवर योग्यवेळी कारवाई केली तर अश्या विकृतीला चाप बसणार

Published by : Shubham Tate

साताऱ्यात पोगरवाडीला जाणाऱ्या घाटात एसटी बसच्या पाठीमागील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून तरुण प्रवास करत असलेला विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करिअर अकॅडमीचा हा युवक असून या अकॅडमीचे विद्यार्थी पोलीस आणि आर्मीचे प्रशिक्षण घेण्यासाठी घाटातून आणि रस्त्यावर धावत असतात. (Dangerous journey of the youth of Academy through the ghat by hanging on the ladder of the bus)

भर पावसात रस्त्यावर हे युवक अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत असताना अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या हुल्लडबाज विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष नसल्यानेच हे धोकादायक उद्योग हे विद्यार्थी करत आहेत. हीच मुले लष्कर आणि पोलीस प्रशिक्षण घेऊन पुढे देश सेवा करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हात निसटून अपघात झाल्यास याला एसटी चालकाला जबाबदार धरले जाणार मात्र एसटीच्या पाठीमागे काय प्रकार सुरू आहे याची पुसटशीही कल्पना बसचालकाला नाही. या विद्यार्थ्यांवर योग्यवेळी कारवाई केली तर अश्या विकृतीला चाप बसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज