नाशिकमधून संतापजनक घटना समोर येत आहे. नाशिकमध्ये नर्स सासूने सुनेच घरातच गर्भपात केला आहे. अंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं सासू आणि नणंदेकडून पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. विवाहितेला छळप्रकरणी आता आडगाव पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित आणि भुपेश पाठक यांचा प्रेमविवाह झाला आहे. मात्र लग्नानंतर पीडित महिलेला सासरच्यांच्या छळाला आणि त्रासाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली. "ही घटना 2024 ची आहे. त्यावेळी तिचा गर्भपात करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिला म्हणाली की, तीन पिल्स दिल्या, एक सलाईन लावली. या गोष्टी पुढे निष्पन्न होतील. तिचा प्रियकर भुपेश पाठक, त्याची आई, भुपेशची बहिण आणि वडील अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सासरा आणि नणंद यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि सासू हिला जातीवाचक शिवीगाळ तसेच गर्भपात करणे, तर मुलावर 376 कलम तसेच गर्भपात अशी कलमं लावण्यात आला आहे," अशी माहिती नाशिकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांनी दिली.