ताज्या बातम्या

Pahalgam Attack : 'तुझे धन्यवाद हिमांशी!'; पहिल्या नौसेना प्रमुखांच्या मुलीनं केलं कौतुक, लिहिलं भावनिक पत्र

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

Published by : Rashmi Mane

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये एका नौदलातील अधिकाऱ्याच्या पत्नीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नेव्हीतील लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, तेव्हा त्यांची पत्नी विनय यांच्या मृतदेहाशेजारीच बसून होती. आपल्या पतीला नौदलाकडून मानवंदना देण्यात येत असताना पत्नी हिमांशी यांनी जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली, तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाच पाणी झालं. आता, हिमांशी यांचा आखणी एक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ पाहून देशाच्या नौदलाचे पहिले प्रमुख अॅडमिरल रामदास कटारी यांची मुलगी ललिता रामदास यांनी हिमांशी यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.

''सेवा, संविधान आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या भावनांप्रति तूझं समर्पण प्रामाणिक आहे. तू अशी महिला आहे. जी स्वत:च्या विचारांना समजू शकते. तू जे बोलली ते या देशातील विचारवंत नागरिकांच्या विचारांचा आणि भावनांचा आवाज आहे. तुझ्याकडून प्रेम आणि करुणा हा संदेश आम्ही सर्वांनी घेऊन शेअर केला पाहिजे, तुझे धन्यवाद हिमांशी!", अशी चिठ्ठी ललिता रामदास यांनी हिमांशीला लिहिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा